वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
वाशीम : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या वाशीम जिल्ह्यातील परिस्थितीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
वाशीम जिल्ह्यात अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाल्याचा दावा दानवे यांनी केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. वाशीम जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करत प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दुष्काळाचा शासन निर्णय तातडीने काढावा आणि शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किती मदत दिली जाणार, याची स्पष्ट घोषणा सरकारने करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली. या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
वाशीमच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आता राजकीय पटलावरही केंद्रस्थानी आला असून, सरकारकडून प्रत्यक्ष मदतीची घोषणा कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026
एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी
10 Sep 2026