एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी
मानोरा : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘एसीएपी’ (Against CAP - नियमित प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर होणारा प्रवेश) किंवा सीईटीच्या ‘स्पॉट राउंड’ (रिक्त जागांसाठी होणारी अंतिम प्रवेश फेरी) मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी मुख्यमंत्री तसेच ओबीसी, भटके-विमुक्त समाजातील लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या २० जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नागपूर यांच्या ७ ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार, यापुढे एसीएपी प्रक्रियेतून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी नियमित ‘कॅप’ (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) तसेच एसीएपीमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळत होता. मात्र, आता एसीएपी किंवा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः करावा लागण्याची शक्यता आहे.
विशेषतः विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यातच पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण, राहण्याचा व जेवणाचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. अशा परिस्थितीत लाखो रुपयांचे शिक्षण शुल्क स्वतः भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही.
आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. एसीएपी म्हणजेच सीईटीच्या स्पॉट राउंडमधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करावी, अशी मागणी तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी केली आहे.

पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026