Site Logo
विदर्भ

प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .

प्रकाशित: 20 Sep 2026, 02:40 PM
82 Views
Featured News Image

प्रोफेसर अनंत सूर्यकार लिखित 

अरबी, फार्सी व हिंदी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द व त्यांचे अर्थ - 

 से - आठवण, सैतान - घोरकर्मी पुरुष, सैरभैर - अस्वस्थ, सैरावैरा - वाट फुटेल तिकडे, स्वारी ( फा)- घोडा इ स्वार होणे /बसणे , हकनाक - विनाकारण, हकीकत ( फा)- अहवाल, घडलेली गोष्ट, हकीम - युनानी वैद्य, हकीमी - वैद्यांचा व्यवसाय, हक्क - अधिकार, मालकी, हक्कदार - अधिकारी, हगामा ,( फा )- कुस्त्यांची दंगल, हंगाम ( फा)- मोसम, ऋतू , हंगामा - धिंगाणा, दंगल , हजरजबाबी - तत्काळ उत्तर देणारा, हजरत - भगवान किंवा महाराज, पैगंबर व बादशहा यांना लावावयाची पदवी , हजारा ( फा)- अनेक धारांनी उडणारे कारंजे, हजेरी - उपस्थिती, हटकून - न चुकता, मुद्दाम, हड्डी ( हिं)-एकूण एक हाड , हदीस - पैगंबरांचे वचन, हद्द - सीमा, मर्यादा, हपीस - कचेरी, हफ्ता ( फ )- हिस्सा, किस्त, हमखास - खात्रीने, निश्चयपूर्वक, हमरस्ता - मोठ्या रहदारीचा रस्ता, हमरीतुमरी - शिवीगाळ, बाचाबाची, हमराह ( फा)- सोबती, सहचर, हमशाधुमशा - धांगडधिंगा, हमाणी / हमीण - पैसे ठेवण्याचा लांब व निरुंद कसा, हमाम ( हिं )- आंघोळ, स्नान, हमामखाना - स्नानगृह, हमामदस्ता - खल व बत्ता, हमामा - गुराख्यांचा एक खेळ, हमी - खात्री,  हमीदार - जामीनदार, हमीधुमीचा - दिखाऊ, भपकेबाज, हमेशा - नेहमी, सतत, हयात - आयुष्य, वय, हर ( फा)- प्रत्येक, हरक - एक प्रकारचे जाड पांढरे कापड, हरकत - आडकाठी विरोध, हरकारा ( फा)- निरोप घेऊन जाणारा दूत, जासूद, हरप / हरफ - अक्षर, वर्ण, हरफ लावणे - दोष लावणे, हर्राजी - लिलाव, हराम - निषिद्ध गोष्ट, त्याज्य वस्तू, हरामखोर - अप्रामाणिक, बेईमान, हरामजादा - लुच्चा, अनौरस, विवाह न झालेल्या संबंधातून झालेला, हराममोत - वाईट प्रकारे आलेले मरण, हरास - लिलाव, हरीफ - शत्रू, हरोल ( हिं )- रांग, सैन्याची आघाडी, हलक - गवयाच्या गळ्यातील फिरत , हलट - गळून गेलेला, हलवा / हलुवा - साखरेच्या पाकातील तीळ , हलाकी - गरिबी, हलाल - पवित्र, धर्माला धरून असरेला , हलालखोर - श्रम करून खाणारा माणूस, हलालखोरी - प्रामाणिकपणा, हल्लर -अंगाईगीत, हल्ला - चढाई, मात, हल्ली - सध्या ,  हवा - प्राणवायू, हवाई - अंतराळातील, हवाई जहाज - विमान, हवाल - चालू परिस्थिती, हवालात - सोपवणूक, ठेवलेली भिस्त, हवालदिल - धीर सुटलेला, हवाला - भरवसा, हवेली - राजवाडा, हशम - परिवार, लवाजमा, हशील - आकार, खर्च ..

क्रमशः..

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

24 Sep 2026

पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ

20 Sep 2026

पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

16 Sep 2026

एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी

10 Sep 2026

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा तीव्र आंदोलन! १६ सप्टेंबरला महाविकास आघाडीचा धडक मोर्चा

09 Sep 2026