फुलउमरी आश्रमशाळेत ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहात
मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील फुलउमरी येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी. डी. खंडारे होते.
विद्यार्थ्यांना भटके-विमुक्त समाजाचा इतिहास, समृद्ध लोकसंस्कृती, कला, परंपरा व सामाजिक योगदान यांची ओळख व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच बंजारा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बंजारा नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या कार्यक्रमातून भटके-विमुक्त समाजाची समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि सामाजिक योगदान विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक जीवन सोनोने यांनी मानले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप; मानोऱ्यात दहा गणेश मंडळांचे शांततेत विसर्जन
27 Sep 2026
नगरपंचायतीचा पर्यावरणपूरक उपक्रम; तीन फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम टाकीत विसर्जन
25 Sep 2026
गणरायाच्या आगमनाने मानोरा भक्तिमय!
13 Sep 2026
दुष्काळाच्या सावटातही मानोरात पोळ्याचा उत्साह बैलजोडी पूजनासह घाट वितरण; ‘गण’च्या सादरीकरणाने वेधले नागरिकांचे लक्ष
10 Sep 2026