Site Logo
उत्सव

नगरपंचायतीचा पर्यावरणपूरक उपक्रम; तीन फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम टाकीत विसर्जन

प्रकाशित: 25 Sep 2026, 02:51 PM
97 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर

मानोरा शहरातील घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृत्रिम प्लास्टिक टाकीची व्यवस्था करण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उमेश राठोड यांच्या पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात आली असून, सुमारे तीन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे या टाकीत विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हावी आणि सार्वजनिक ठिकाणी विसर्जनामुळे होणारी गैरसोय टाळता यावी, या उद्देशाने नगरपंचायतीने हा उपक्रम राबविला.

यावेळी गणेशभक्तांनी विधिवत पूजा करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. नगरपंचायतीच्या या व्यवस्थेमुळे नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध झाली.

यावेळी बंडू तेलगुंठे, सागर शर्मा यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी, नागरिक व गणेशभक्त उपस्थित होते.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: