मानोरा तालुक्यात पोळ्याचा उत्साह; तीन गावांनी पोलिस बंदोबस्त नाकारला! कारखेडा, आसोला व देऊरवाडीचा निर्णय; ठाणेदार नैना पोहेकर यांची माहिती
मानोरा : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मानोरा पोलिस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये गावनिहाय पोलिस बंदोबस्त देण्यात येतो. यंदाच्या पोळा सणासाठीही पोलिस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मात्र, कारखेडा, आसोला आणि देऊरवाडी या केवळ तीन गावांनी पोलिस बंदोबस्त नको असल्याचे कळविले आहे, अशी माहिती मानोरा पोलिस ठाण्याच्या ठाणेदार नैना पोहेकर यांनी दिली.
पोळा हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण असून बैलांची सजावट, मिरवणूक आणि पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात. सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून गावनिहाय बंदोबस्ताचे नियोजन केले जाते. तालुक्यातील बहुतांश गावांनी पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता व्यक्त केली असून, केवळ तीन गावांनी तो नाकारला आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप; मानोऱ्यात दहा गणेश मंडळांचे शांततेत विसर्जन
27 Sep 2026
नगरपंचायतीचा पर्यावरणपूरक उपक्रम; तीन फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम टाकीत विसर्जन
25 Sep 2026
गणरायाच्या आगमनाने मानोरा भक्तिमय!
13 Sep 2026
दुष्काळाच्या सावटातही मानोरात पोळ्याचा उत्साह बैलजोडी पूजनासह घाट वितरण; ‘गण’च्या सादरीकरणाने वेधले नागरिकांचे लक्ष
10 Sep 2026