Site Logo
उत्सव

गणरायाच्या आगमनाने मानोरा भक्तिमय!

प्रकाशित: 13 Sep 2026, 03:44 PM
87 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : सण-उत्सवांचा राजा असलेल्या गणेशोत्सवाला मानोरा शहरासह ग्रामीण भागात उत्साहात सुरुवात झाली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख चौक गणेशोत्सवाच्या रंगात रंगले आहेत.

धार्मिक वातावरणाला भक्तीची किनार

मानोरा शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, आरती तसेच धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग वाढली आहे. घरोघरीही पारंपरिक पद्धतीने श्रींची स्थापना करण्यात आली असून, शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे.

शहरातील प्रमुख गणेश मंडळे :

राधाकृष्ण गणेश मंडळ गणेश मंडळ — वडरपुरा,  गजराज गणेश मंडळ — संतोषी माता नगर, संकट मोचन गणेश मंडळ जुनीवस्ती,शहीद वीर भगतसिंग गणेश मंडळ — शिवनेरी पेट्रोल पंप,मोरया गणेश मंडळ — दिग्रस रोड,

सत्य साई गणेश मंडळ — वसंतनगर,न्यू संघर्ष गणेश मंडळ — छत्रपती शिवाजी चौक,

नवयुवक गणेश मंडळ — कोरपे कॉलनी ,जय बजरंग गणेश मंडळ — राम मंदिर, वसंतनगर,राज्यस्थानी गणेश मंडळ — दिग्रस चौक,महाकाल गणेश मंडळ — वसंतनगर

सामाजिक एकोप्याचा संदेस  

गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची जोड मिळत आहे. तालुक्यातील ३२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात असून, ग्रामीण भागात एकूण ७५ ठिकाणी गणरायाची स्थापना होणार आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला जात आहे.

शांततेसाठी पोलिसांचा बंदोबस्त

उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मानोरा पोलिसांकडून शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश मंडळे आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा करण्याचे आवाहन ठाणेदार नैना पोहेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गणरायाच्या आगमनाने मानोरा तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांत धार्मिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सवाची रंगत वाढणार आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: