Site Logo
विदर्भ

मानोरा खरेदी-विक्री संस्थेची वार्षिक आमसभा उत्साहात संस्थेच्या विकासासह सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

प्रकाशित: 03 Sep 2026, 12:52 PM
121 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : मानोरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपना विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन आगामी वर्षातील नियोजन, आर्थिक बाबी तसेच सभासदांच्या हितासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे व्यवस्थापक एस. व्ही. इंगळे यांनी मागील वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत सभेसमोर मांडणी केली. तसेच समितीने संमत केलेल्या कामकाजाचा वार्षिक अहवाल व वार्षिक हिशोबाची पत्रके सभेसमोर वाचून मंजुरीसाठी ठेवण्यात आली.

वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा झालेल्या अधिक खर्चास मंजुरी देणे, सन २०२५-२६ च्या नफ्याच्या वाटणीस मंजुरी देणे, सन २०२६-२७ या वर्षासाठी उपविधी क्रमांक ३ च्या मर्यादेत कर्ज मर्यादा मंजूर करणे, सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक वाचून मंजूर करणे, तसेच सन २०२५-२६ च्या अंकेक्षण अहवालातील दोष दुरुस्तीबाबत तयार केलेल्या अहवालास मंजुरी देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सन २०२६-२७ या वर्षासाठी अंकेक्षकाची नियुक्ती करण्याच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. संस्थेचे कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व सभासदांच्या हिताचे राहावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

सभेला संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपना विक्रांत देशमुख, संचालक भारत चव्हाण, गणेश पवार, दादाराव दुमारे, रूपेश पवार, जगदीश वाघमारे, धनंजय वानखेडे, अन्वर पटेल, गणेश मिसाळ, सौ. पद्मा देशमुख तसेच सभासद यशवंत इंगळे, सुरेश पाटील गावंडे, विक्रांत देशमुख, नागनाथ आप्पा घाटरे, सुभाष पवार, प्रविण देशमुख उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक एस. व्ही. इंगळे तसेच कर्मचारी पिंजरकर, आमटे, ठाकरे, शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेची आर्थिक व प्रशासकीय वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

## सभासदांचे हित हेच संस्थेचे सर्वोच्च प्राधान्य”

संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करून खरेदी-विक्री संस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील. सभासदांना संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा व लाभ मिळवून देण्यासाठी पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गतिमान कारभारावर भर देण्यात येईल. संस्थेच्या विकासासाठी संचालक मंडळ, कर्मचारी आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने एकजुटीने काम करून मानोरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेला भविष्यात अधिक भरभराटीच्या दिशेने नेण्याचा संकल्प आहे.”

इजिनिअर.सौ. सपना विक्रांत देशमुख

अध्यक्षा, मानोरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

24 Sep 2026

प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .

20 Sep 2026

पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ

20 Sep 2026

पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

16 Sep 2026

एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी

10 Sep 2026