ईफखार पटेल यांची वाशिम जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
मानोरा : प्रतिनिधी — काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले ईफखार पटेल यांची वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मानोरा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईफखार पटेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे. ते १० वर्षे खरेदी-विक्री संघाचे संचालक, ९ वर्षे मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच १५ वर्षे सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले आहेत. याशिवाय त्यांनी तब्बल १७ वर्षे मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळले असून, ३ वर्षे वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
सन १९८५ पासून मानोरा तालुक्यात काँग्रेस पक्षाचा आमदार नसतानाही, विविध स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी क्षेत्रात काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असल्याचे पटेल यांनी सांगितले. खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पंचायत समितीमध्ये काँग्रेसची ताकद निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
गाव तिथे काँग्रेस संघटन उभारणार
आगामी काळात मानोरा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष ईफखार पटेल यांनी सांगितले. “गाव तिथे काँग्रेस पक्षाची संघटना उभी करून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणार असून, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीप सरनाईक तसेच वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांना दिले. पक्षाने सोपविलेली नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जिल्ह्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026