Site Logo
विदर्भ

धुवाधार पावसातही बापूभक्तांचा उत्साह शिगेला; पोहरादेवीत ७० भाविकांचे रक्तदान, ३० हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती

प्रकाशित: 28 Jul 2026, 01:31 PM
164 Views
Featured News Image

मानोरा : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या ९१ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धुवाधार पावसातही हजारो भाविकांचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र मंगळवार ला पाहायला मिळाले. बापू समाधी परिसरात आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ७० भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान करून राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांना मानवंदना अर्पण केली.

जन्मोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पालख्यांचे पूजन धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज तसेच देविभक्त शेखर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजनावेळी जय बापू जय सेवालाल च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

बापू आश्रम व बापू समाधी परिसरात सकाळपासूनच भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देविभक्त शेखर महाराज, संजय महाराज, भक्ताराज महाराज,सुभाष महाराज,राहुल महाराज, मनीष महाराज, रामेश्वर राठोड,यांच्यासह सेवेकरी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वातावरण अधिक आल्हाददायक झाले होते. पावसाची तमा न बाळगता पालख्यांसह आलेले भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन-कीर्तन आणि नामस्मरणात तल्लीन झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. मुसळधार पावसातही भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याने संपूर्ण पोहरादेवी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या ९१ व्या जन्मोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ३० हजारांहून अधिक भाविकांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे हजेरी लावत बापूंच्या समाधीचे दर्शन घेतले. धार्मिक परंपरेबरोबरच रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमामुळे या जन्मोत्सवाला सामाजिक बांधिलकीचीही प्रेरणादायी जोड मिळाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

24 Sep 2026

प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .

20 Sep 2026

पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ

20 Sep 2026

पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

16 Sep 2026

एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी

10 Sep 2026