बळीराजासाठी भरपूर पावसाची बापू समाधीस्थळी आरदास ; पोहरादेवीत हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप
मानोरा प्रतिनिधी : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ रामराव महाराज (बापू) समाधीस्थळी पौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त २७ व २८ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवीभक्त शेखर महाराज यांच्या पुढाकारातून दर्शनासाठी आलेल्या हजारो बापू भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण राज्यासह देशात मुबलक पाऊस पडून बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, अशी आरदास करण्यात आली.
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दर पौर्णिमेला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून भाविक जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज तसेच बापू समाधीस्थळी माता टेकण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बापू समाधीस्थळी दर पौर्णिमेला देवीभक्त शेखर महाराज यांच्या पुढाकारातून अन्नदान व महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
यावेळी पौर्णिमा दोन दिवसांची असतानाच रक्षाबंधनाचा सण असल्याने पोहरादेवीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी बापू समाधीस्थळी महाआरती करण्यात आली. त्यानंतर विधिवत भोग व भंडारा अर्पण करण्यात आला. यावेळी देवीभक्त शेखर महाराज यांनी आर्दास करून, संपूर्ण राज्यासह देशात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाच्या शेतशिवारात हिरवाई नांदू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना केली.
धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तिभाव, सेवा आणि अन्नदानाच्या या उपक्रमातून पोहरादेवीच्या पवित्र भूमीत सामाजिक एकोपा व श्रद्धेचे दर्शन घडले.
महाप्रसाद वाटपाच्या व्यवस्थेसाठी संजय महाराज,मनीष महाराज, धर्मराज महाराज, गणेश राठोड व जगदीश पवार यांनी परिश्रम घेतले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026