शिष्यवृत्ती परीक्षेत इंडियाज फाउंडेशन स्कूल ऑफ ऑक्सफर्डचा झेंडा; गौरी चव्हाण तालुक्यात प्रथम
मानोरा : गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध तयारीच्या जोरावर इंडियाज फाउंडेशन स्कूल ऑफ ऑक्सफर्ड, लालमाती-मानोरा या शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. गौरी सचिन चव्हाण हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच कु. जतीन आशिष भगत व कु. पार्थ रामेश्वर बेहेरे यांनी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील नियमित व दर्जेदार अध्यापन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसाठीचे विशेष नियोजन आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक पद्धतीचा मोठा वाटा असल्याचे पालकांनी सांगितले. ३६५ दिवस विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही संकल्पना राबविणाऱ्या या शाळेत शिष्यवृत्ती, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही विशेष मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे दिसून येते.
शाळेचे अध्यक्ष सचिन वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरणाचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यासाठी शाळेचा प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा
25 Sep 2026
मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा
20 Sep 2026
मानोरा तालुका होणार प्लास्टिकमुक्त; गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
15 Sep 2026
रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद
10 Sep 2026