Site Logo
वाशिम जिल्हा

रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद

प्रकाशित: 10 Sep 2026, 02:25 PM
124 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील  रुई  येथे एका कंपनीचा टॉवर असूनही गेल्या काही महिन्यांपासून नेटवर्कच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यातच मागील १० ते १२ दिवसांपासून मोबाईलवर नेटवर्कचे पूर्ण सिग्नल दिसत असतानाही कॉल कनेक्ट होत नसल्याची, तसेच कॉल लागल्यानंतर आवाज ऐकू येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या बाबत तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे सह विविध विभागाकडे गावऱ्यांनी निवेदन दिले आहे.

रुई गावातील व परिसरातील नागरिक यांनी एका कपंनीचे शेकडो सिमकार्ड वापरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नेटवर्क व इंटरनेट सेवा बंद असल्याने शेतातील पीक पेराच्या नोंदीसह शासकीय ऑनलाइन कामे, डिजिटल व्यवहार, बँकिंगसह दैनंदिन ऑनलाइन सेवांवर परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

# सिग्नल फुल’ पण कॉल मात्र फेल!

मोबाईलवर नेटवर्कचे सिग्नल पूर्ण दिसत असतानाही प्रत्यक्षात कॉल न लागणे आणि इंटरनेट सेवा उपलब्ध न होणे, हा प्रकार ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टॉवर असूनही सेवा मिळत नसेल तर ग्राहकांनी नेमके काय करायचे?, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या १० ते १२ दिवसांपासून सेवा प्रभावित असल्याने त्या कालावधीतील रिचार्जची सेवा ग्राहकांना मिळालेली नाही. त्यामुळे सेवा ज्या कालावधीसाठी बंद आहे, त्या कालावधीची १२ दिवसांची मुदत ग्राहकांच्या रिचार्जमध्ये वाढवून देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

# समस्या न सुटल्यास कठोर भूमिकेचा इशारा

या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नेटवर्क व इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी रुईच्या उपसरपंच धनश्री रूंदन गावंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. समस्या तातडीने निकाली न काढल्यास रुई ग्रामस्थांच्या वतीने कठोर भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर उपसरपंच धनश्री गावंडे, हरिओम गावंडे सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: