ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
मानोरा प्रतिनिधी | दि. ८ सप्टेंबर २०२६ : ग्रामीण भागातील एलपीजी गॅस ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण ग्राहकांसाठी लागू असलेली ४५ दिवसांची रिफिल बुकिंगची अट कमी करून २५ दिवस करण्यात आली आहे. हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
जुना नियम — ४५ दिवसांचे अंतर
फेब्रुवारी २०२६ मध्ये मध्यपूर्वेतील तणावामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर मागणी नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांना दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला होता. त्यामुळे मुदत पूर्ण होण्यापूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या.
नवा नियम — २५ दिवसांनी बुकिंग
आता एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ग्रामीण भागातील ४५ दिवसांची अट शिथिल करण्यात आली असून मागील रिफिल बुकिंगनंतर २५ दिवसांनी पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे. ग्रामीण आणि शहरी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा समान नियम लागू करण्यात आला आहे. सरकारी तेल कंपन्यांना — IOCL, BPCL आणि HPCL — या बदलाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
## ग्राहकांना बुकिंगचा त्रास होणार कमी
यापूर्वी ४५ दिवसांची मुदत पूर्ण न झाल्यास बुकिंग करताना ‘चार तासांनंतर पुन्हा प्रयत्न करा’ असा एरर येत असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता २५ दिवसांनी बुकिंग करता येणार असल्याने ग्रामीण ग्राहकांना आवश्यकतेनुसार सिलिंडर वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे.
## ग्रामीण ग्राहकांच्या दृष्टीने हा निर्णय दिलासादायक असून बुकिंगमधील अडचणी कमी होऊन ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळण्यास मदत होईल,अशी प्रतिक्रिया जय पोहरादेवी गॅस इंडेनचे संचालक महंत संजय महाराज यांनी दिली.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा
25 Sep 2026
मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा
20 Sep 2026
मानोरा तालुका होणार प्लास्टिकमुक्त; गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
15 Sep 2026
रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद
10 Sep 2026