मानोरा तालुका होणार प्लास्टिकमुक्त; गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
मानोरा प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प मानोरा तालुक्यात करण्यात आला आहे. गणेश मंडळे, शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त मानोरा तालुका अभियान.
गणेश सजावटीसाठी कागद, कापड, बांबू आणि नैसर्गिक फुलांचा, तर महाप्रसादासाठी कागदी किंवा केळीच्या पानांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजारातही प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त मानोरा तालुका अभियान.
विसर्जनावेळी प्लास्टिक आणि निर्माल्य नदी-तलावात न टाकता त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करण्याची सूचना देण्यात आली आहे. शाळांमधून प्रतिज्ञा, प्रभातफेरी, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त मानोरा तालुका अभियान.
या अभियानासाठी गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, गट शिक्षण अधिकारी विलास जाधव, अनिल पवार आणि तालुका शिक्षक समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रवीण म्हातारमारे यांच्यासह शिक्षण विभाग व शिक्षकवृंद पुढाकार घेत आहेत.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा
25 Sep 2026
मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा
20 Sep 2026
रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद
10 Sep 2026
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026