Site Logo
वाशिम जिल्हा

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा

प्रकाशित: 25 Sep 2026, 02:23 PM
94 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर

गणेश विसर्जन मिरवणुका सुरळीत व सुरक्षित पार पडाव्यात, यासाठी मानोरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने दिग्रस चौक, तहसील मार्ग तसेच कारंजा व मंगरुळपीर रस्त्यावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले.

मुख्य रस्त्याच्या कडेला फळ विक्रेते, पानपट्ट्या, चहा व नाश्ता सेंटरची दुकाने आदींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केली. अतिक्रमणे हटविल्यानंतर मुख्य रस्ते मोकळे झाले असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

या मोहिमेत ठाणेदार नैना पोहेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम सरोदे, जयदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, बिट जमादार गणेश राठोड, विनोद राठोड, चेतन भोयर, जमादार संदीप इंगळे, शंकर राख यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: