पुरातन बुरुज कोसळून एकाचा मृत्यू; पत्नी गंभीर मानोरा तालुक्यातील तळप बु. येथील घटना
मानोरा प्रतिनिधी : मानोरा तालुक्यातील तळप बु. येथे दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घराजवळील पुरातन बुरुज अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत सतीष तुळशीराम इंगोले (वय ४६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सतीष इंगोले हे गावातील पुरातन बुरुजालगत वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता ते बुरुजाजवळ उभे असताना, तर त्यांच्या पत्नी घरासमोर भांडी धुत असताना, बुरुजाचा काही भाग अचानक कोसळला. क्षणात दोघेही ढिगाऱ्याखाली दबले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, मानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीष इंगोले यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीला पुढील उपचारासाठी दिग्रस येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेने तळप बु. गावात हळहळ व्यक्त होत असून, सतीष इंगोले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पुरातन व जीर्ण झालेल्या बुरुजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेनिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा
25 Sep 2026
मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा
20 Sep 2026
मानोरा तालुका होणार प्लास्टिकमुक्त; गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
15 Sep 2026
रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद
10 Sep 2026