हर घर तिरंगा’ अभियानात मानोऱ्यात भव्य तिरंगा रॅली
मानोरा : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे देशभक्तीपर वातावरणात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यालयापासून सुरू झालेली रॅली पंचायत समिती कार्यालय, मानोरा येथे नेण्यात आली.
रॅलीमध्ये विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश दिला.
पंचायत समिती परिसरात रॅली पोहोचल्यानंतर गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासह देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तिरंगा हा देशाची एकता, अखंडता आणि अभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिस्त व उत्साहाने सहभाग नोंदवल्याने संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मानोऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य रस्ते मोकळे; पोलिसांच्या कारवाईने विसर्जन मार्गाला मिळाला दिलासा
25 Sep 2026
मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा
20 Sep 2026
मानोरा तालुका होणार प्लास्टिकमुक्त; गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
15 Sep 2026
रुईत नेटवर्क ठप्प; ग्रामस्थ संतप्त दहा-बारा दिवसांपासून कॉलही नाही, इंटरनेटही बंद
10 Sep 2026