कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
मानोरा : कृषी केंद्राची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची पूर्तता अहवाल वरिष्ठांकडे सादर न करणे तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल न पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण वर्ग-२ उमेश राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सापळा रचून पकडले.
राठोड हे तालुका कृषी कार्यालय, मानोरा येथे कार्यरत आहेत. संबंधित कृषी केंद्राची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर न करण्यासाठी तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल पुढे न पाठविण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता सापळा रचण्यात आला. या कारवाईत उमेश राठोड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पीआय अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एचसी योगेश खोटे, पीसी महेश परमेश्वर, सतीश गुळदे तसेच चालक नागेश चेक यांनी केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे मानोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नॉन-क्रीमीलेअरचा प्रश्न?रोखठोक लेखमाला – भाग ५
29 Sep 2026
वसंतराव नाईकांच्या नावाचे महामंडळ; निधीची आकडेवारी समोर, तरी लाभार्थ्यांच्या हातात पैसा कधी?रोखठोक भाग ४
28 Sep 2026
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कधी? रोखठोक भाग ३
27 Sep 2026
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा लढा : आता समितीपलीकडे निर्णयाची वेळ! रोखठोक | भाग – २
26 Sep 2026