घरकुल योजनेत लाचखोरिचा आरोप, चौकशीची मागणी
मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत लाचखोरी, दलालांचा हस्तक्षेप व अनियमितता होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील काही अधिकारी एजंटांच्या माध्यमातून घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमिशन न देणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते रोखले जात असून, काही अपात्र लाभार्थ्यांना आर्थिक व्यवहारातून लाभ दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मोदी आवास, पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनांमध्ये निकषांचे उल्लंघन करून दुहेरी घरकुल मंजूर झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा प्रा. ओम बलोदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी श्याम पवार, देवा बारसे, रामनाथ राठोड, नितेश लवटे, कुणाल पुरी, वैभव गावंडे, सतीश राठोड, महेश राठोड, अशोक मनवर, सुनील चव्हाण, रामेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नॉन-क्रीमीलेअरचा प्रश्न?रोखठोक लेखमाला – भाग ५
29 Sep 2026
वसंतराव नाईकांच्या नावाचे महामंडळ; निधीची आकडेवारी समोर, तरी लाभार्थ्यांच्या हातात पैसा कधी?रोखठोक भाग ४
28 Sep 2026
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कधी? रोखठोक भाग ३
27 Sep 2026
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा लढा : आता समितीपलीकडे निर्णयाची वेळ! रोखठोक | भाग – २
26 Sep 2026