अखिल भारतीय तांडा सुधार समितीची नांदेड जिल्हा व किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर
पोहरादेवी न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी कडून : संविधानिक मूल्यांवर प्रेम आणि संविधानवादी समाजनिर्मितीचा विचार घेऊन कार्यरत असलेल्या अखिल भारतीय तांडा सुधार समितीची नांदेड जिल्हा तसेच किनवट तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात समितीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार आहे.
नांदेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी अनिल भिकू राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी संतोष पवार व वसंत राठोड, सचिवपदी पंडित राठोड, कोषाध्यक्षपदी भीमराव राठोड, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार दुर्गदास राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.
याचबरोबर किनवट तालुका कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. तालुका प्रमुख म्हणून वायम राठोड, उपाध्यक्षपदी प्रदीप जाधव, सचिवपदी डी. एस. पवार, सहसचिवपदी नवीन जाधव, तर प्रसिद्धी प्रमुखपदी शिवराम जाधव यांची निवड करण्यात आली. शहर प्रमुख म्हणून वसंत रंगराव राठोड यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड, मांगीलाल आडे, विनोद पवार, प्रा. शिवराम जाधव व चव्हाण साहेब यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनाही संघटनेच्या कार्यासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. सरदार राठोड, प्रा. डॉ. सुभाष जाधव आणि महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विष्णू चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाला नागपूर जिल्हाध्यक्ष राजू रत्ने, सचिव राजेश महिंदरे, विलास राठोड यांच्यासह नांदेड व किनवट तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक अन्वर मिर्झा, अभय नगराळे, दया पाटील, संजय गुरुनुले यांच्यासह संविधानप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ परिवर्तनवादी साहित्यिक प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रमेश राठोड, महासचिव नामा बंजारा, प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ कथाकार प्रा. डॉ. विजय जाधव तसेच केंद्रीय व राज्य कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नॉन-क्रीमीलेअरचा प्रश्न?रोखठोक लेखमाला – भाग ५
29 Sep 2026
वसंतराव नाईकांच्या नावाचे महामंडळ; निधीची आकडेवारी समोर, तरी लाभार्थ्यांच्या हातात पैसा कधी?रोखठोक भाग ४
28 Sep 2026
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कधी? रोखठोक भाग ३
27 Sep 2026
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा लढा : आता समितीपलीकडे निर्णयाची वेळ! रोखठोक | भाग – २
26 Sep 2026