फुलउमरीचे सामाजिक कार्यकर्ते रामराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन
मानोरा :तालुक्यातील फुलउमरी येथील अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्त्व व सामाजिक कार्यकर्ते रामराव हरी पवार यांचे अल्पशा आजाराने १३ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता दुःखाद निधन झाले. मृत्यूसमयी ते ५९ वर्षांचे होते.
गावातील सर्वांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे, अडचणीच्या काळात प्रत्येकाला मदतीचा हात देणारे आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात मोठी ओळख होती. त्यांच्या या अचानक जाण्याने फुलउमरी गावासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि तीन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याला समाज मुकला असल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
या श्रेणीमध्ये इतर बातम्या नाहीत.