Site Logo
आरोग्य

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बेशुद्ध बालकाला शुद्धी; तीन दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी डिस्चार्ज

प्रकाशित: 24 Jul 2026, 06:54 PM
14 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी :

तालुक्यातील माहुली येथील अवघ्या १३ महिन्यांच्या बालकाचा वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना घडली. खोकला व हगवणामुळे प्रकृती गंभीर झालेल्या या चिमुकल्याला बेशुद्ध अवस्थेत मानोरा चौक, दिग्रस येथील जाधव चिल्ड्रन अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले. शरीरातील पाण्याची तीव्र कमतरता, कफ वाढल्याने न्यूमोनियाचा संशय आणि हात-पाय थंड पडलेली गंभीर अवस्था पाहता वैद्यकीय पथकाने तातडीने उपचारांची दिशा ठरविली. सलग दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉ. जाधव तसेच प्राजक्ता, दुर्गा, मोहिनी, पूनम व शीतल या कर्मचाऱ्यांच्या टीमने बालकाला शुद्धीवर आणण्यात यश मिळविले.

या काळात आपल्या लेकराच्या प्रकृतीमुळे आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र बालकाने शुद्धी मिळवताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यानंतर पुढील तीन दिवस नियमित उपचार करून प्रशांत, दिपाली, उज्वला व सिंपल यांच्या सहकार्याने बालकाची प्रकृती पूर्णपणे सुधारली आणि त्याला सुखरूप घरी पाठविण्यात आले.

वेळेत आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे आपल्या मुलाचा जीव वाचल्याने पालकांनी डॉ. अर्जुन जाधव व संपूर्ण वैद्यकीय पथकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही डॉ. अर्जुन जाधव यांनी गंभीर डेंग्यूग्रस्त तसेच नवजात शिशूंवर यशस्वी उपचार करून परिसरात विश्वासार्ह बालरोगतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळविला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते २४ तास बालरोग सेवा देत असून, जनरल सर्जन डॉ. वैशाली जाधव अपेंडिक्स तसेच विविध शस्त्रक्रिया नियमितपणे करत आहेत. मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील रहिवासी असलेले डॉ. अर्जुन जाधव हे सामाजिक कार्यातही नेहमीच सक्रिय असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

या श्रेणीमध्ये इतर बातम्या नाहीत.